बहुमतानंतरही भाजपची लातूरमध्ये सावध भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 05:48 IST2020-01-06T05:48:37+5:302020-01-06T05:48:46+5:30
जिल्हा परिषदेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व असतानाही राज्यातील महाविकास आघाडीच्या घडामोडी पाहून भाजपने सावध भूमिका घेतली आहे.

बहुमतानंतरही भाजपची लातूरमध्ये सावध भूमिका
लातूर : जिल्हा परिषदेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व असतानाही राज्यातील महाविकास आघाडीच्या घडामोडी पाहून भाजपने सावध भूमिका घेतली आहे. रविवारी दुपारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्हा परिषदेतील भाजपच्या सर्व सदस्यांची मते जाणून घेऊन पक्ष मजबुतीसाठी कानमंत्र दिला. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांचे नाव बैठकीतच दिले जाईल.
एकूण ५८ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपचे ३५, काँग्रेस १५, राष्ट्रवादी ५, शिवसेना १, अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. एकुर्का गटातील धीरज देशमुख हे विधानसभेत निवडून आल्यामुळे ही जागा रिक्त आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी झाले आहे. भाजपच्या सर्व सदस्यांना शनिवारी रात्री लातुरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी आणण्यात आले होते.