कारखान्यात बाॅयलरचा स्फोट; दोन कामगार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:07 IST2019-05-20T21:07:01+5:302019-05-20T21:07:03+5:30
औसा राज्य मार्गावरील बुधोडा शिवारात असलेल्या ओमेक्स फर्टिलायझर्स प्रा. लि. कंपनीत बाॅयलरचा स्फोट झाला

कारखान्यात बाॅयलरचा स्फोट; दोन कामगार ठार
लातूर : औसा राज्य मार्गावरील बुधोडा शिवारात असलेल्या ओमेक्स फर्टिलायझर्स प्रा. लि. कंपनीत बाॅयलरचा स्फोट झाला असून, यामध्ये दोघा कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. मृतांमध्ये मेहताब बाबूमियाॅ मुल्ला (३६ रा. सेलू ता. औसा), उदयचरण कोल ललईराज कोल (रा. बहरी मध्य प्रदेश) या दोघा कामगारांचा समावेश आहे.