हॉस्टेलसमोरून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST2021-02-23T04:29:36+5:302021-02-23T04:29:36+5:30
नवरत्ननगर येथून रोख रक्कम व अंगठी लंपास लातूर : शहरातील नवरत्ननगर साई रोड येथील घरातून कपाटात ठेवलेली ५ ग्रॅम ...

हॉस्टेलसमोरून दुचाकीची चोरी
नवरत्ननगर येथून रोख रक्कम व अंगठी लंपास
लातूर : शहरातील नवरत्ननगर साई रोड येथील घरातून कपाटात ठेवलेली ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, मोबाइल व २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी फिर्यादी विजय सुभाष खानापुरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. देशमुख करीत आहेत.
मोटारसायकलची धडक; एक जण जखमी
लातूर : जुना बार्शी रोड ते पाण्याची टाकी या रोडवर विना नंबर असलेल्या मोटारसायकलने भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने चालवून फिर्यादीच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात फिर्यादी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी बळीराम खंडेराव सोनटक्के यांच्या तक्रारीवरून नंबर नसलेल्या मोटारसायकलच्या चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंद आहे. पुढील तपास सपोसई. जगताप करीत आहेत.
कोकाटेनगर येथून मोबाइलची चोरी
लातूर : कोकाटेनगर येथील रूममध्ये असताना कोण्या तरी अज्ञात चोरट्याने रूमचे दर उघडून ९ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी फिर्यादी प्रज्वल किशोर काटे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाॅ.चौघुले करीत आहेत. दरम्यान, शहरात मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.