शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

लातूरात आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा; पिस्टलच्या धाकावर ३ कोटींची रोकड, दागिने लुटले

By राजकुमार जोंधळे | Updated: October 12, 2022 17:35 IST

दरोडेखोरांनी सव्वा दाेन काेटींची राेकड, ७३ लाखांचे साेने पळविले

लातूर : चाकूचा आणि पिस्टलचा धाक दाखवत लातूर शहरातील कातपूर राेडवरील एका बंगल्यावर पाच जणांच्या टाेळीने सशस्त्र दराेडा टाकल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. दराेडेखाेरांनी तब्बल सव्वा दाेन काेटींची राेकड आणि ७३ लाखांचे साेने पळविले. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लातूर जिल्ह्यातील आतापर्यंतचा हा सर्वात माेठा दराेडा असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

पाेलिसांनी सांगितले, राजकमल अग्रवाल हे लातुरातील माेठे व्यापारी आहेत. त्यांचा बंगला कातपूर राेडवरील कन्हैयानगर, रामचंद्र नगरात बंगला आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास चार ते पाच दराेडेखाेर त्यांच्या घरात घुसले. घरात प्रवेश करताच राजकमल अग्रवाल यांना झाेपेतून जागे करण्यात आले. त्यांच्या गळ्याला चाकू लावला, पिस्टलसह धाररदार हत्याराचा धाक दाखविण्यात आला. यावेळी घरात अग्रवाल, पत्नी, मुलगा आणि सून असे चार जण हाेते.

दराेडेखाेरांनी अग्रवाल कुटुंबाला धमकाव त्यांच्याकडील माेबाइल काढून घेतले. राजकमल अग्रवाल यांच्याकडून कपाट आणि लाॅकरच्या चाव्या काढून घेत सिनेस्टाईलपद्धतीने दाराेडा टाकला. यावेळी एकूण सव्वादाेन काेटींची राेकड आणि ७३ लाखांचे साेने असा जवळपास तीन काेटींचा मुद्देमाल पळविला. दराेडेखाेरांनी जाताना घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर समजून वायफायचा बाॅक्स नेला. आम्ही बराच वेळ इथे थांबणार आहाेत, असे दराेडेखाेरांनी बजावले. काहीही हालचाल करु नका, आरडाओरडा करु नका, काेणाशीही संपर्क साधू नका, असे धमकावले. हे दराेडेखाेर २५ ते ३० वयाेगटातील असून, ते मराठी भाषा बाेलत हाेते, असे पाेलिसांनी सांगितले.

श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण...पहाटे सव्वातीनच्या सुमारास दराेडेखाेरांनी घर साेडताच, अग्रवाल यांनी विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्याशी संपर्क साधला. घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठाेपाठ श्वानपथक, ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पाेलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी भेट देवून पाहणी केली. दराेड्यात तब्बल तीन काेटींचा मुद्देमाल पळविल्याचे दुपारपर्यंत समाेर आले.

शांत डाेक्याने डाकला दराेडा...पाच जणांच्या टाेळींने हा सशस्त्र दराेडा अतिशय प्लॅनिंगने, शांत डाेक्याने टाकल्याचे समाेर आले आहे. या बंगल्यावर आणि अग्रवाल यांच्यावर पाळत ठेवूनच हा दराेडा टकला असावा. श्वान पथक घटनास्थळावरच घुटमळाल्याने दराेडेखाेर एखाद्या वाहनातून पसार झाले असावेत, असाही अंदाज पाेलिसांना व्यक्त केला आहे. जिल्ह्यात सर्वात माेठ्या दराेड्याचा तपास करण्याचे आव्हान पाेलिसांसमाेर आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी