बायो सीएनजी, पीएनजी सेंद्रिय खतनिर्मिती कारखान्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:18 IST2021-05-15T04:18:43+5:302021-05-15T04:18:43+5:30

अध्यक्षस्थानी ॲड. संभाजीराव पाटील होते. यावेळी शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर कुलकर्णी, शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांचे उत्पादन तिप्पट करून ...

Bhumi Pujan of Bio CNG, PNG Organic Fertilizer Factory | बायो सीएनजी, पीएनजी सेंद्रिय खतनिर्मिती कारखान्याचे भूमिपूजन

बायो सीएनजी, पीएनजी सेंद्रिय खतनिर्मिती कारखान्याचे भूमिपूजन

अध्यक्षस्थानी ॲड. संभाजीराव पाटील होते. यावेळी शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर कुलकर्णी, शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांचे उत्पादन तिप्पट करून शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वकांक्षी असून जैविक इंधन आणि सेंद्रिय खत निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अर्थकारणास बळकटी मिळणार असल्याचे प्रभाकर कुलकर्णी यांनी सांगितले. कारखान्याच्या माध्यमातून शिरूर अनंतपाळचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी संचालक मंडळ जिद्दीने कार्य करतील, असा विश्वास असल्याचे ॲड. संभाजीराव पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी चेअरमन दत्ता शिवणे, व्हा. चेअरमन ओमप्रकाश गलबले, सचिव उमाकांत पाटील, संचालक ऋषीकेश बद्दे, बसवराज शिवणे, गंगाधर चाकोते, डाॅ गोविंद चेवले, नंदकुमार शिवणे यांच्यासह विविध गावातील २५ शेतकऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विरभद्र बेंबळगे यांनी केले. आभार उमाकांत पाटील यांनी मानले.

Web Title: Bhumi Pujan of Bio CNG, PNG Organic Fertilizer Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.