३१३ किमी लांबीच्या ११७ शेत, पाणंद रस्त्यांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:25 IST2021-02-27T04:25:50+5:302021-02-27T04:25:50+5:30

यावेळी आ. अभिमन्यू पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी विकास ...

Bhumi Pujan of 117 farms, Panand roads of 313 km length | ३१३ किमी लांबीच्या ११७ शेत, पाणंद रस्त्यांचे भूमिपूजन

३१३ किमी लांबीच्या ११७ शेत, पाणंद रस्त्यांचे भूमिपूजन

यावेळी आ. अभिमन्यू पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, भूमिअभिलेख उपाधीक्षक अविनाश मिसळ, अभियंता श्रीनिवास गंगथडे, जि.प. सदस्य भागवत कांबळे, सरपंच मल्लिकार्जुन दानाई, उपसरपंच सुवर्णाताई गुंजोटे, दत्तात्रय गुंजोटे, धर्मण्णा बालकुंदे, संतोष कण्णा, संजय मुळे, भालचंद्र पाटील, सुरेश किवडे, शिवदत्त गुंजोटे, बसप्पा ईटले, इंद्रजित मुळे, सिद्धेश्वर मुळे, संगमेश्वर जावळे, अमर किवडे, दिलीप दानाई, वाक्साचे सरपंच विनायक पाटील, बालाजी पाटील, लक्ष्मण होळकर, टाकळीचे सरपंच बालाजी जाधव, प्रा. धनराज ईटले, दिलीप दानाई, सतीश काळे, सुमन बडुरे, सावित्रा ईरले, कमलाबाई गोपाळे, संगीता मुळे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक सरपंच मल्लिकार्जुन दानाई, सूत्रसंचालन सुनील मुळे यांनी केले, तर आभार गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी मानले.

आ. अभिमन्यू पवार म्हणाले, आमदार निधीतून मतदारसंघातील ८६ गावांतील ७२७ किमी लांबीच्या २७० वेगवेगळ्या शेतरस्त्यांचे माती व दबई काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. मातीकाम पूर्ण झाल्यानंतर या सर्व रस्त्यांचे मनरेगाअंतर्गत खडीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी प्रस्ताव दखल करण्यात येईल. सध्याच्या उपकेंद्रांची व शिवारातील डीपींची क्षमता वाढविण्यासाठी, पाणी पुरवठा योजनांसाठी स्वतंत्र डीपी मंजूर करवून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले, जिल्ह्यात काम करताना रस्ते, वीज आणि वाहतूक हे तीन विषय प्राधान्याचे असतील. शेतरस्ते मोकळे करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी.

Web Title: Bhumi Pujan of 117 farms, Panand roads of 313 km length

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.