भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:07+5:302020-12-07T04:14:07+5:30
उदगीर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी अभिवादन केले. यावेळी ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
उदगीर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी अभिवादन केले. यावेळी बसवराज पाटील नागराळकर, देवीदास कांबळे, सभापती शिवाजी मुळे आदी उपस्थित होते, तसेच भाजपच्या वतीनेही अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश चिटणीस गोविंदराव केंद्रे, पालिकेचे उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, पंडित सूर्यवंशी, दत्ता पाटील, मनोज पुदाले आदी उपस्थित होते.
उदगीरमध्ये काँग्रेसच्या वतीने अभिवादन
उदगीर येथे रविवारी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, विजयकुमार निटुरे, विक्रांत भोसले, शहराध्यक्ष मंजुरखाँ पठाण, फैजुखाँ पठाण, अहमद सरवर, शेख महेबूब, श्रीरंग कांबळे, अमोल घुमाडे, सतीश पाटील, प्रा. शिवाजी देवनाळे, शशिकांत बनसोडे आदी उपस्थित होते.
देवणी तालुक्यातील वलांडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी धनराज बनसोडे, अनिल मोदाळे, रवींद्र बनसोडे, अंतेश्वर बनसोडे, राजकुमार बनसोडे, सतीश बनसोडे, प्रकाश गायकवाड, सदाशिव वाघमारे, संजय बाबरे, परमेश्वर सूर्यवंशी, तुकाराम बनसोडे, पप्पू बनसोडे, विकी बनसोडे, दयानंद बनसोडे, विष्णू मोदाळे, विमलबाई बनसोडे, विलास वाघमारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत वाघमारे यांनी केले. आभार नितीन वाघमारे यांनी मानले.
लातूर तालुक्यातील तांदुळजा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजी बावणे,
माजी सरपंच श्रीमंत गायकवाड, विनोद वाघचौरे, अभिलाष वाघचौरे, सिद्धार्थ वाघचौरे, प्रकाश वाघचौरे, श्याम वाघचौरे, बालासाहेब जोगदंड, सिद्धांत वाघचौरे, रोहन सावंत, निखिल वाघचौरे, स्वप्नील वाघचौरे, भास्कर कसबे, गणेश वाघमारे आदी उपस्थित होते.