बेलकुंड ग्रामस्थांनी पाळला कडकडीत जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST2021-04-05T04:17:58+5:302021-04-05T04:17:58+5:30
औसा तालुक्यात आता दिवसेंदिवस काेराेना बाधितांची संख्या वाढत आहे. काेराेनाने डाेके वर काढल्याने, तालुका प्रशासनाची डाेकेदुखी वाढली आहे. त्याचबराेबर ...

बेलकुंड ग्रामस्थांनी पाळला कडकडीत जनता कर्फ्यू
औसा तालुक्यात आता दिवसेंदिवस काेराेना बाधितांची संख्या वाढत आहे. काेराेनाने डाेके वर काढल्याने, तालुका प्रशासनाची डाेकेदुखी वाढली आहे. त्याचबराेबर आराेग्य प्रशासनाकडून उपाययाेजना केल्या जात आहेत. वाढत्या काेराेना बाधितांच्या रुग्णांचा आकडा राेखण्यासाठी जनता कर्फ्यू हा उपाय असल्यने बेलकुंड गावात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थांनीही कडकडीत बंद पाळत जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, असे सरपंच विष्णू कोळी म्हणाले.
औसा तालुक्यातील बेलकुंड येथे मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याला आवर घालण्यासाठी, काेराेनाची साखळी तोडण्यासाठी गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन, सरपंचांनी केले हाेते. या आवाहनाला व्यापारी, ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला आहे. रविवारी गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. गावातील रुग्णालय, औषधी दुकान वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद हाेती. त्याचबराेबर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात फवारणी करण्यात आली. तर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन, आराेग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी...
औसा तालुक्यासह बेलकुंड परिसरात काेराेना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी नागरिकांनी आता स्वत:सह कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे. घरातील व्यक्तीला काही प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास, तातडीने जवळच्या आराेग्य केंद्रात, रुग्णालयात दाखल हाेत तपासणी करुन घ्यावी. बाधितांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांनी तातडीने आराेग्य प्रशासनाला माहिती द्यावी, तपासणी करुन घ्यावी. मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे, सतत हात धुणे यासह काळजी घेणे, हाच काेराेनावर उपाय आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी वावरु नये, असे आवाहन आराेग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.