भांडण लावून दिल्याच्या कारणावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:20 IST2021-04-01T04:20:35+5:302021-04-01T04:20:35+5:30
लातूर : गावातील इतर मुलांमध्ये झालेले भांडण तूच लावून दिलास, त्यांना आम्हाला मारायला लावले आहेस याचा राग धरून फिर्यादी ...

भांडण लावून दिल्याच्या कारणावरून मारहाण
लातूर : गावातील इतर मुलांमध्ये झालेले भांडण तूच लावून दिलास, त्यांना आम्हाला मारायला लावले आहेस याचा राग धरून फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नी, आईस घरात घुसून मारहाण केल्याची घटना कव्हा येथे घडली. याबाबत लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघाजणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, गावातील इतर मुलांमध्ये भांडण लावून दिल्याच्या संशयावरून फिर्यादी गोपाळ बाबू वांगे (रा. कव्हा, ता. जि. लातूर) यांना नरसिंग ऊर्फ पप्पू कचरू इरले व अन्य तिघांनी घरात घुसून मारहाण केली. फिर्यादीच्या पत्नीस व आईस शिवीगाळ केली. दारात ५०० लिटर बॅरल कुऱ्हाडीने फोडले. तसेच घराच्या दारात उभी केलेल्या कारचेही नुकसान केले. गाडीचे अंदाजे २० हजारांचे नुकसान केले. काचा फोडल्या असून, गाडीच्या समोरील बोनेट लाकडाने, कुऱ्हाडीने फोडून काढला, असे गोपाळ वांगे यांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार नरसिंग ऊर्फ पप्पू कचरू इरले याच्यासह अन्य तिघांविरुद्ध (सर्व रा. कव्हा) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेरले करीत आहेत.
जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून दुचाकीची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार्किंग केलेल्या एमएच २४ एव्ही ८९२४ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना २३ मार्च रोजी घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रेणापूर तालुक्यातील सेलू येथील गोविंद राम जाधव यांनी जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दुचाकी (एमएच २४ एव्ही ८९२४) पार्किंग केली होती. अज्ञाताने ही दुचाकी लंपास केली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.