पैशाच्या कारणावरुन एकाला लाकडाने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST2021-07-18T04:15:41+5:302021-07-18T04:15:41+5:30

लातूर : पैशाच्या कारणावरुन एकाच्या डाेक्यात लाकडाने मारहाण करुन जखमी केल्याची घटना चाकूर तालुक्यातील बाेकनगाव तांडा येथे घडली. याप्रकरणी ...

Beating someone with a stick for money | पैशाच्या कारणावरुन एकाला लाकडाने मारहाण

पैशाच्या कारणावरुन एकाला लाकडाने मारहाण

लातूर : पैशाच्या कारणावरुन एकाच्या डाेक्यात लाकडाने मारहाण करुन जखमी केल्याची घटना चाकूर तालुक्यातील बाेकनगाव तांडा येथे घडली. याप्रकरणी चाकूर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन एकाविराेधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले की, फिर्यादी दीपक महादेव बेंडके (२०, रा. जानवळ, ता. चाकूर) यांना बाेकनगाव तांडा येथील हरिश्चंद्र भानुदास राठाेड याने मला पैसे दे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी ताेंडावर, कानावर मुका मार दिला. हातातील लाकडाने डाेक्यात मारहाण केली. यामध्ये फिर्यादी दीपक बेंडके हा जखमी झाला आहे. यावेळी राठोडने जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना १५ जून राेजी बाेकनागाव तांडा येथे घडली. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन हरिश्चंद्र राठाेड याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beating someone with a stick for money