संगनमत करून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST2021-05-12T04:20:03+5:302021-05-12T04:20:03+5:30

आदर्श कॉलनी येथून विद्युत मोटारीची चोरी लातूर : घराच्या कंपाउंडमध्ये नळाला पाणी येणार आहे म्हणून लावलेली विद्युत मोटार चोरीला ...

Beating one by connivance | संगनमत करून एकास मारहाण

संगनमत करून एकास मारहाण

आदर्श कॉलनी येथून विद्युत मोटारीची चोरी

लातूर : घराच्या कंपाउंडमध्ये नळाला पाणी येणार आहे म्हणून लावलेली विद्युत मोटार चोरीला गेल्याची घटना ९ मे रोजी घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी ॲड. सुनील काशिनाथ चौधरी (रा. न्यू आदर्श कॉलनी, लातूर) यांनी घराच्या कंपाउंडमध्ये नळाला पाणी येणार आहे म्हणून ०.५ एचपीची मोटार नळावर लावली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. या प्रकरणी ॲड. सुनील चौधरी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. चौगुले करीत आहेत.

खानापूर शिवारातून पाणबुडी मोटार चोरीस

लातूर : खानापूर शेतशिवारातील शेतात असलेल्या शेडमध्ये ठेवलेली पाच एचपी इलेक्ट्रिकल पाणबुडी मोटार, स्प्रिंकलर पाईप चोरीला गेल्याची घटना २९ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी रेणापूर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी रंजन विठ्ठलराव चव्हाण (वय ६०, रा. खानापूर, ता. रेणापूर) यांनी खानापूर शेतशिवारातील आपल्या शेतातील शेडमध्ये पाच एचपी इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी पाणबुडी मोटार अंदाजे किंमत नऊ हजार आणि स्प्रिंकलर पाईल १० नोजल किंमत ८ हजार असा एकूण १७ हजार रुपयांचा माल शेडचे कुलूप तोडून चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादी रंजन चव्हाण यांच्या तक्रारीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. जाधव करीत आहेत.

Web Title: Beating one by connivance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.