बाभळीचे झाड तोडण्यावरून वाढवणा शिवारात मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST2021-07-01T04:14:57+5:302021-07-01T04:14:57+5:30
उदगीर तालुक्यातील वाढवणा शिवारात बाभळीचे झाड तोडण्याच्या कारणावरून संपत व्यंकट वाघमारे यांना व त्यांच्या पत्नीला तसेच मुलाला धक्काबुक्की करून ...

बाभळीचे झाड तोडण्यावरून वाढवणा शिवारात मारहाण
उदगीर तालुक्यातील वाढवणा शिवारात बाभळीचे झाड तोडण्याच्या कारणावरून संपत व्यंकट वाघमारे यांना व त्यांच्या पत्नीला तसेच मुलाला धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. दगडाने गुडघ्यावर तसेच उजव्या हाताच्या दंडावर मारहाण करण्यात आली, असे वाढवणा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार तानाजी मारुती वाघमारे व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. येमले करीत आहेत.
कारची दुचाकीला धडक; एक जण जखमी
औसा ते निलंगा जाणाऱ्या रोडवर भरधाव वेगातील एमएच ४४ जी ३४५७ या क्रमांकाच्या कार चालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणे वाहन चालवून धडक दिली. या धडकेत एमएच २४ बीई ७४१७ या क्रमांकाच्या दुचाकीवरील भीमराव काशिनाथ धोत्रे जखमी झाले. याबाबत धोत्रे यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिसात सदर कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फुलारी करीत आहेत.