पैशाच्या कारणावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST2021-04-12T04:17:56+5:302021-04-12T04:17:56+5:30
मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण लातूर : मागील भांडणाची कुरापत काढून कुऱ्हाडीच्या तुंब्याने पायावर, घोट्यावर मारून एकाला मुकामार दिल्याची ...

पैशाच्या कारणावरून मारहाण
मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण
लातूर : मागील भांडणाची कुरापत काढून कुऱ्हाडीच्या तुंब्याने पायावर, घोट्यावर मारून एकाला मुकामार दिल्याची घटना पाटील गल्ली रेणापूर येथे घडली. याबाबत जीवन विनायक पाटील (रा. पाटील गल्ली, रेणापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमित कल्याण पाटील (रा. पाटील गल्ली, रेणापूर) याच्याविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. खाकरे करीत आहेत.
भारत विकास परिषदेतर्फे ऑक्सिजन मशीनचे लोकार्पण
लातूर : सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या भारत विकास परिषदेच्या वतीने कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन दोन ऑक्सिजन मशीनचे वाटप महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन मशीनची गरज लागल्यास त्यांना हे मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रोटरी क्लबतर्फे मास्क वापरण्यासाठी जनजागृती
लातूर : कोरोना आजारावर मास्क म्हणजे ढाल आहे. सुरक्षित राहण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे मास्क वापरणे हा होय. त्यामुळे नागरिकांनी चांगल्या प्रतीचा मास्क दररोज धुवून संपूर्ण नाक झाकला जाईल, अशा पद्धतीने वापरावा असे प्रबोधन रोटरी क्लबच्या वतीने करण्यात येत आहे.
माझा मास्क-माझी सुरक्षा, मास्क वापरा-स्वत:ला वाचवा आदी घोषवाक्य लिहिलेले संदेशाचे फलक लावून जनजागृती करण्यात येत आहे. गंजगोलाईच्या पूर्व भागात फलक लावण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक हिबारे, सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी सहकार्य केले. कामगार व गरजूंना ५०० मास्कचे वाटप झाले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष राजगोपाल राठी, सचिव संगमेश्वर बोमणे, बस्वराज उटगे, प्रकल्प उपप्रमुख नानिकभाई जोधवानी, गोपाल हरियानी यांनी परिश्रम घेतले.
लसीकरण मोहिमेला १०० टक्के प्रतिसाद
लातूर : कोरोनाविरुद्धच्या लढाईत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत आहे. लसीकरणात देखील शासन विक्रमी पद्धतीने व पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. कोरोना रोखण्यासाठी शासनाने मेरा मास्क-मेरी जिम्मेदारी यासारखी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मोहिमेत सहभाग नोंदवून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले. हरंगुळ (बु.) येथील उपकेंद्रात नागरिकांनी या लसीकरणाला शंभर टक्के प्रतिसाद दिला. यावेळी उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्नील पवार, गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, निवासी नायब तहसीलदार राजेश जाधव, एस.एस. उगिले, सरपंच सूर्यकांत सुडे आदींची उपस्थिती होती.