खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बीबीएफ तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:20 IST2021-05-21T04:20:50+5:302021-05-21T04:20:50+5:30
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा ...

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बीबीएफ तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा कृषी मंडळातील नणंद येथील शेतकऱ्यांच्या शेतावर बीबीएफ तंत्रज्ञानाविषयी प्रात्याक्षिक घेण्यात आले. या वेळी बीबीएफ यंत्राच्या साह्याने रुंद वरंबा सरीद्वारे सोयाबीन, मूग, उडीद पिकाची पेरणी कशी करायची याची माहिती कृषी साहाय्यक सुनील घारुळे यांनी दिली. घरगुती सोयाबीनची उगवण क्षमता तपासून पेरणीयोग्य बियाणांस बीजप्रक्रिया करून बीबीएफ तंत्राने पेरणी करावी, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी रणजीत राठोड यांनी केले. या वेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे व शेतकरी उपस्थित होते.
बीबीएफ तंत्रज्ञानाचे फायदे...
बीबीएफ पेरणी यंत्राच्या साह्याने उतारास आडवी पेरणी केल्याने मूळ स्थानी जलसंधारण होते. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून अधिकचे उत्पन्न मिळते. पावसात खंड पडल्यास अथवा पाणी कमी असल्यास या पद्धतीमुळे वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जातो. पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. जास्तीचा पाऊस झाल्यास या पद्धतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी बाहेर पडते. मुबलक हवा व सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होते. पाण्याची बचत होते. उत्पन्नामध्ये निश्चित वाढ होते, असे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे म्हणाले.