लोककला शासकीय समितीवर बंकट पुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:14+5:302021-02-05T06:24:14+5:30

... बोकनगावच्या परिवर्तन ग्रामविकासतर्फे सत्कार लातूर : तालुक्यातील बोकनगाव येथील ग्रामपंचायतीत परिवर्तन ग्रामविकास पॅनेलचे ९ पैकी ८ उमेदवार विजयी ...

Bankat Puri on the Folk Art Government Committee | लोककला शासकीय समितीवर बंकट पुरी

लोककला शासकीय समितीवर बंकट पुरी

...

बोकनगावच्या परिवर्तन ग्रामविकासतर्फे सत्कार

लातूर : तालुक्यातील बोकनगाव येथील ग्रामपंचायतीत परिवर्तन ग्रामविकास पॅनेलचे ९ पैकी ८ उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांनी माजी आ. शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांचा सत्कार केला. यावेळी किशोर दाताळ, अंत्येश्‍वर दाताळ, शामराव सूर्यवंशी, विलासराव सूर्यवंशी, दयानंद स्वामी, आत्माराम जाधव यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी कव्हेकर यांनी सर्व विजयी उमेदवारांचे कौतुक केले.

...

चन्नबसवेश्वर फार्मसीच्या गायकवाड सर्वप्रथम

लातूर : पीएच.डी. प्रवेशासाठी नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या येथील चन्नबसवेश्वर महाविद्यालयाच्या प्रा. वर्षा गायकवाड यांनी फार्मसी विभागातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला तसेच प्रा. जयश्री स्वामी ट्वितीय, प्रा. रामलिंग सुगावे तृतीय, प्रा. दत्ताहरी कौडेवार चतुर्थ आले. तसेच पेट परीक्षेतही प्रा. वर्षा गायकवाड, प्रा. विजयानंदा खडकूतकर व प्रा. जयश्री स्वामी यांनी यश संपादन केले आहे. त्यांच्या यशाचे कौतुक प्राचार्य डॉ. संजय थोंटे यांनी करून सत्कार केला तसेच संस्थेचे सचिव भीमाशंकर देवणीकर, विजयकुमार मठपती गुरुजी, सिद्धेश्वरअप्पा हलकुडे, सिद्धया स्वामी, डॉ. अशोक सांगवीकर, प्राचार्य डॉ. विजयेंद्र स्वामी यांनीही कौतुक केले.

Web Title: Bankat Puri on the Folk Art Government Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.