शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

दुष्काळाच्या उंबरठ्यावरील शेतकऱ्यांना पीककर्ज वसुलीसाठी बँकेच्या नोटिसा

By हरी मोकाशे | Updated: August 28, 2023 20:58 IST

बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले : व्याज अकारणी तब्बल १४.५ टक्के

लातूर : वरुणराजाने दीर्घ ताण दिल्याने खरिपातील पिके माना टाकत आहेत. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा हतबल होऊन वर्ष कसे काढावे अशा चिंतेत असताना निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेने कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा तरी चांगले उत्पादन मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु, हंगामाच्या सुरुवातीपासून संकटे सुरू झाली. विलंबाने पाऊस झाल्याने जुलैमध्ये खरिपाच्या पेरण्या झाल्या. पिकांपुरता पाऊस झाल्यामुळे पिके बहरली होती. सध्या सोयाबीन फूल, शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, पावसाने जवळपास महिनाभरापासून उघडीप दिली आहे. विशेष म्हणजे, ऑगस्टमध्ये ५० वर्षांतील सर्वांत कमी पाऊस झाला आहे. परिणामी, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेने थकीत पीक कर्जासाठी कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.

शेतकऱ्यांना कायदेशीर नोटिसा...येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेकडून काही शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले. हे कर्ज परतफेडीचे तारण, हमी व विनंतीवरून देण्यात आले होते. त्यासाठी सुरक्षा तारण, दस्तऐवज शेतकऱ्यांनी दिले आहे. तसेच वेळोवेळी दस्ताऐवजाचे नूतनीकरणही करून देण्यात आले आहे. त्यामुळे कर्जावर द.सा.द.शे. ७ टक्के व थकीत रकमेवर नियमाप्रमाणे व्याजासह वसुली देऊन परतफेड करण्याचे मान्य केले होते, असे म्हणत शेतकऱ्यांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

३० दिवसांत कर्जाचा भरणा करावा...नोटिसा मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेकडे कर्जाचा भरणा करावा अन्यथा कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे नोटिसीत बजावले आहे. अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत असलेला शेतकरी आता नोटिसीमुळे नव्या संकटात सापडला आहे. विशेषत: सध्या शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजाचा भरणा करणेही शक्य नाही.

अडीच टक्के आकारले दंड व्याज...थकीत पीक कर्जावर १२ टक्के व्याज तसेच २.५ टक्के दंड व्याज लागू करण्यात आला आहे. एकूण १४.५ टक्के व्याज आकारणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखेत कर्जाची रक्कम व व्याज भरणा न केल्यास कायदेशीर नोटिसांचा खर्चही खातेदारांच्या नावे टाकण्यात येत असल्याचे नोटिसीत स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांपुढे नवे संकट...औरादसह परिसरातील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आम्हा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी दत्ता ढाेरसिंगे यांनी केली.

कर्जदारांनी नियमित भरणा करावा...अनेक शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत आहे. त्यामुळे व्याज वाढले आहे. कर्जदारांनी नियमित कर्जाचा भरणा करावा अथवा बँकेच्या ओटीएस योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे शाखा व्यवस्थापक रवी नाईक यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी