स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बँक कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST2021-04-07T04:20:24+5:302021-04-07T04:20:24+5:30
ऋण समाधान योजनेमध्ये सुट्टीच्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा शिराळा येथील शाखाधिकारी नाग ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बँक कर्मचाऱ्यांचा सत्कार
ऋण समाधान योजनेमध्ये सुट्टीच्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा शिराळा येथील शाखाधिकारी नाग राजू व कृषी अधिकारी पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याने याभागातील जास्तीत जास्त शेतकरी कर्जमुक्त झाले. सातबारा वरील बोजाही कमी झाला. तसेच बेबाकी प्रमाणपत्र त्या शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांचा स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष नवनाथ शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोगिराज साखरे, शाखाधिकारी नाग राजू, ठाकूर, दीपक हक्के, परशुराम जावळे, राजेसाहेब भिसे, बालाजी लकडे, महादू काळे, दौलत पाटील, भैरवनाथ झाडके, बाबा महाराज, अनिल शिंदे, पद्माकर भिसे, शिवाजी वायाळ आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी पटेल म्हणाले, बँकेने सदरील योजना पुन्हा सुरू करावी, जेणेकरून आणखीन शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. शेतकरी कर्जमुक्त होतील. ही योजना ३१ मार्च रोजी बंद झाली आहे.