शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी किल्लारी बंद; आक्रमक महिलांचा घागरमोर्चा, रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 17:38 IST

किल्लारीत तीन महिन्यांपासून नळाला पाणी आल नाही

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी ठेवली बाजारपेठ बंदटँकर नको, माकणी धरणाचे पाणी द्या़

किल्लारी (लातूर )  : तीन महिन्यांपासून नळाला पाणी नसल्याने किल्लारीतील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे़ गावास नळाद्वारे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करीत गावातील महिला आक्रमक होत सोमवारी सकाळी घागरमोर्चा काढला़ तसेच लातूर- उमरगा मार्गावर एक तास रास्तारोको आंदोलन केले़ 

औसा तालुक्यातील किल्लारी हे ३० हजार लोकसंख्येचे गाव आहे़ दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी पातळी खालावली आहे़ परिणामी, गावातील ९० टक्के बोअर कोरडे पडले आहेत तर उर्वरित १० टक्के बोअरला अत्यल्प प्रमाणात पाणी येत आहे़ गावास माकणी प्रकल्पातून ३० खेडी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होत होता़ परंतु, तीन महिन्यांपासून नळाद्वारे येणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे़ पाणी पुरवठ्याची विद्युत मोटार जळाली, जलवाहिनी फुटली अशी विविध कारणे सांगितली जात आहेत़ त्यामुळे गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे़ गावास सुरळीत पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी किल्लारीतील महिला आक्रमक होत घागरमोर्चा काढला, तर या आंदोलनात नागरिकांनी सहभागी होत महिलांसोबत रास्तारोको आंदोलन केले़ दरम्यान, गावकऱ्यांच्या या आंदोलनास पाठिंबा दर्शवित गावातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली़

यावेळी पाणी द्या अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या़ आमदार, खासदारांचे लक्ष नसल्याने गावातील नळांना तीन महिन्यांपासून पाणी येत नाही, असे आंदोलनकर्ते म्हणत होते़ यावेळी प्रा़ हरिश्चंद्र कांबळे म्हणाले, तीन महिन्यांपासून नळाला पाणी नसतानाही तुरटीवर दीड लाखाचा खर्च झाला कसा? ग्रामपंचायतीने पाण्यासाठी १५ लाखांचा खर्च दाखविला आहे़ परंतु, पाणीच नाही तर तो खर्च झाला कसा? ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून कागदोपत्री मेळ घालण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला़ माकणी धरणावरुन ३० खेडी पाणीपुरवठा योजना दोन दिवसांत सुरु करा, अन्यथा आत्मदहन करु, असा इशारा महिलांनी दिला़या आंदोलनात मोहन गायकवाड, विनायक बिराजदार, सुरेश सावळगे, कृष्णहरी क्षीरसागर, प्रा़ हरिश्चंद्र कांबळे, बिभिषण कांबळे, वसंत मंजुळे, बाबुराव झाकडे, अनिता साठे, जयश्री कांबळे यांनीही ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त केला़

हे आंदोलन शांततेत पार पडावे म्हणून बिभिषण कांबळे, मोहन गायकवाड गुरुजी, बाबुराव झाकडे, ईश्वर गायकवाड, विनायक बिराजदार, राजेंद्र कुलकर्णी, दयानंद गायकवाड, प्रा़ हरिश्चंद्र कांबळे, विजय भोसले, पाशा पटेल यांनी परिश्रम घेतले़ तसेच आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून सपोनि विनोद मेत्रेवार, पीएसआय गणेश कदम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़

टँकर नको, माकणीचे पाणी द्या़़़गावकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी सतीश पाटील यांनी निवेदन स्वीकारले़ यावेळी विस्तार अधिकारी मांदळे, मंडळ अधिकारी हाश्मी, तलाठी बालाजी जाधव होते़ यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील यांनी सध्या तीन टँकर मंजूर केले आहेत़ त्यात आणखीन वाढ करता येईल, असे म्हणताच महिलांनी टँकर नको, माकणी धरणाचे नळाद्वारे पाणी द्यावे, अशी मागणी केली़

रास्तारोकोनंतर महिला ग्रामपंचायतीकडेरास्तारोको आंदोलन झाल्यानंतर संतप्त महिलांनी आपला मोर्चा ग्रामपंचायतीवर नेला़ परंतु, तिथे सरपंचासह एकही सदस्य उपस्थित नव्हता़ त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निषेध केला़

टॅग्स :Waterपाणीagitationआंदोलनlaturलातूरdroughtदुष्काळ