लातूर एमआयडीसीत होणार बांबू लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:58 IST2020-12-04T04:58:23+5:302020-12-04T04:58:23+5:30
११ हजार बांबूंची होणार लागवड... गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. हवेतील ऑक्सिजन कमी होत असून, कार्बनचे प्रमाण ...

लातूर एमआयडीसीत होणार बांबू लागवड
११ हजार बांबूंची होणार लागवड...
गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. हवेतील ऑक्सिजन कमी होत असून, कार्बनचे प्रमाण वाढले आहे. लातूर जिल्ह्यात केवळ ०.६६ टक्के वनक्षेत्र आहे. ते वाढविण्याची आवश्यकता असून, त्यासाठी एमआयडीसी परिसरात ११ हजार बांबूंची लागवड होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असेही माजी आ. पाशा पटेल यांनी सांगितले. यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांनी बांबू लागवडीच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.