मराठवाड्यात बांबूची शेती वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:54+5:302021-02-05T06:23:54+5:30

लोदगा येथे सुरू होत असलेल्या बांबूपासून फर्निचर निर्मिती प्रकल्पाची माहिती देताना करपे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे अवघ्या ...

Bamboo farming will increase in Marathwada | मराठवाड्यात बांबूची शेती वाढणार

मराठवाड्यात बांबूची शेती वाढणार

लोदगा येथे सुरू होत असलेल्या बांबूपासून फर्निचर निर्मिती प्रकल्पाची माहिती देताना करपे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे अवघ्या १२० शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केली होती. ते एक क्रांतिकारक पाऊल ठरले. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० हजारापेक्षा अधिक शेतकरी बांबूची लागवड करीत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक प्रयोग केले, ते सर्व यशस्वी ठरले आहेत. बांबूपासून भेटवस्तू, फर्निचर तसेच इतरही अनेक वस्तू तयार करता येतात. त्यामुळे सदरील शेती भविष्यात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे बांबू या विषयात ही क्रांती घडली आहे. त्यांनी बांबूला झाडाच्या व्याख्येतून गवतामध्ये आणले. यामुळे आता बांबू तोडणे किंवा त्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी घ्यावी लागत नाही. बांबूला मोठे भवितव्य आहे. नितीन गडकरी यांच्यासारख्या कार्यक्षम नेत्याने आता यात लक्ष घातले आहे. बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असून यासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

बांबूचे शंभर वर्षे उत्पादन...

फिनिक्स फाऊंडेशनचे चेअरमन तथा राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले, लातूर जिल्ह्यातून पाच तरुण कुडाळ येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, एकूण २० जणांची टीम लोदगा येथील फर्निचर निर्मिती प्रकल्पात काम सुरू करतील. याठिकाणी अद्ययावत अशी टिश्यू कल्चर लॅबही उपलब्ध आहे. शासनाने ठरवून दिलेल्या जातीची शेतकऱ्यांनी एकदा बांबू लागवड केल्यावर त्यापासून तब्बल १०० वर्षे उत्पादन घेता येते. मराठवाड्यात बांबू लागवड शक्य आहे. त्यासाठी शासनाने सांगितलेल्या बलकोवा जातीची लागवड केली जावी, असेही ते म्हणाले.

Web Title: Bamboo farming will increase in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.