उर्दू विभागातील सिद्दीकी हुमा अंजुम मुशीर अहमद ही ८९.४७ टक्के गुण मिळवून उर्दू विषयाच्या विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम आली आहे. कादरी सईद जरीना बेगम नेमत कादरी ही ८३.८२ टक्के गुण मिळवून तृतीय आली. भूगोल विभागातील प्रियंका रंगवाळ ही ८५.८२ टक्के गुण मिळवून विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम आली. हिंदी विभागातील लक्ष्मी पांडे ही ७४.४७ टक्के गुण मिळवून विद्यापीठ गुणवत्ता यादीत तृतीय आली. समाजशास्त्र विभागातील पिंजारी हिना सिराज ही ७४.३५ टक्के गुण मिळवून समाजशास्त्र विषयाच्या विद्यापीठ गुणवत्ता यादीत तृतीय आली. इंग्रजी विभागातील दायमी सुबिया तमकीन दायमी मोहंमद नईमोद्दीन ही ७८.२४ टक्के गुण मिळवून इंग्रजी विषयाच्या विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम आली.
यशस्वी विद्यार्थिनींना डॉ. हमीद अश्रफ, डॉ. मकबूल अहमद, डॉ. एम. पी. मानकरी, डॉ. एम. जे. कुलकर्णी, डॉ. ए. यू. नागरगोजे, डॉ. बी. एस. भुक्तरे, डॉ. शफीका अन्सारी, डॉ. एस. व्ही.भद्रशेटे, डॉ. एस. आर. नागोरी, प्रा. आर. एम. मुदुडगे, प्रा. एस. एम. सूर्यवंशी, डॉ. के. आर. गव्हाणे, प्रा. ए. यू. मुंडे , प्रा. पी. व्ही. आंबेसंगे, दुष्यन्त तिरुके यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वींचे कौतुक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले.