फायनान्सच्या बॅक वसुली अधिकाऱ्यास लुटणाऱ्या दाेघांच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:24 IST2021-09-06T04:24:28+5:302021-09-06T04:24:28+5:30
पाेलिसांनी सांगितले, स्माॅल फायनान्समध्ये बॅक वसुली अधिकारी म्हणून खाजा मैनाेद्दिन मुजावर हे काम करतात. दरम्यान, ते २ सप्टेंबर राेजी ...

फायनान्सच्या बॅक वसुली अधिकाऱ्यास लुटणाऱ्या दाेघांच्या आवळल्या मुसक्या
पाेलिसांनी सांगितले, स्माॅल फायनान्समध्ये बॅक वसुली अधिकारी म्हणून खाजा मैनाेद्दिन मुजावर हे काम करतात. दरम्यान, ते २ सप्टेंबर राेजी शिरुर अनंतपाळ तालुक्यातील शेंद गावामध्ये कर्जदारांकडे कर्जाच्या हप्ता वसुलीसाठी गेले हाेते. वसुलीनंतर ते शेंद येथून लातूरच्या दिशेने आपल्या माेटारसायकलवरून सायंकाळच्या सुमारास निघाले. तळेगाव पाटीच्या पुढे आल्यानंतर पाठीमागून आलेल्या माेटारसायकलवरील तिघांनी त्यांच्या माेटारसायकलला पायाने धक्का मारला. यावेळी फिर्यादी खाजा मैनाेद्दिन मुजावर हे खाली पडले. यावेळी तिघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. काही कळण्याच्या आतच १ लाख २६ हजार ५३० रुपये, माेबाईल, टॅब मशीन असा एकूण १ लाख ३८ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला. याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलीस ठाण्यात तिघा अज्ञाताविराेधात २०५/ २०२१ कलम ३९४, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. याप्रकरणी पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पथकाला विशेष सूचना केल्या. याप्रकरणी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे हालकी येथून बंडू माधव सूर्यवंशी (३४) आणि विक्रम राजेंद्र सूर्यवंशी (२२) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ५ दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. अधिक तपास पाेलीस निरीक्षक सुडके करीत आहेत.