तालुका प्रमुखपदी बाबुराव शेळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:19 IST2021-04-02T04:19:34+5:302021-04-02T04:19:34+5:30
... चाकुरातील रेशन दुकानदारांना कोविड लसीकरण चाकूर : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना गुरुवारी येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लस देण्यास ...

तालुका प्रमुखपदी बाबुराव शेळके
...
चाकुरातील रेशन दुकानदारांना कोविड लसीकरण
चाकूर : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना गुरुवारी येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, नायब तहसीलदार बालाजी चितळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. दीपक लांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे उपस्थित होते. रेशन दुकानावर धान्यासाठी लाभार्थी जातात. त्यामुळे दुकानदारांचा संपर्क होतो. त्यामुळे लसीकरण करण्यात येत असल्याचे तहसीलदार डॉ. बिडवे यांनी सांगितले. लाभार्थ्यांनीही मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स राखावा, असे आवाहन केले.
...
लिंगायत महासंघ जिल्हा उपाध्यक्षपदी दयानंद मठपती
कासार बालकुंदा : लिंगायत महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दयानंद मठपती तगरखेडकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार, सरचिटणीस चंद्रकांत काला पाटील यांनी दिली. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. काशिनाथ राजे, नागनाथअप्पा भुरके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे, निलंगा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अरुण सोळूंके, संजय कदम, विश्वनाथ स्वामी, ञ्यंबक स्वामी, मन्मथ स्वामी, निळकंठ स्वामी, श्रीकांत स्वामी, सरपंच मल्लिकार्जून दानाई, डॉ. मल्लिकार्जून शंकद, अविनाश बिराजदार, कोराळीकर, देवेंद्र कोराळे, बस्वराज पाटील, शिवशरण पाटील, उमेश बडूरे, लक्ष्मण कांबळे, सुभाष डावरगावे, बस्वराज राघो, प्रभात पाटील आदीनीं केले.
...