कुंचल्यातून केली तंबाखू सेवन न करण्यासाठी जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST2021-06-01T04:15:30+5:302021-06-01T04:15:30+5:30

शासनाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ हे आरोग्यास घातक असल्याचे सांगितले आहे. असे पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी घातली ...

Awareness for not using tobacco made from brushes | कुंचल्यातून केली तंबाखू सेवन न करण्यासाठी जागृती

कुंचल्यातून केली तंबाखू सेवन न करण्यासाठी जागृती

शासनाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ हे आरोग्यास घातक असल्याचे सांगितले आहे. असे पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी घातली आहे. ३१ मे हा दिवस म्हणजे तंबाखू विरोधी दिन आहे. त्याच अनुषंगाने कल्लूरच्या श्री पांडुरंग विद्यालयातील कलाशिक्षक चंद्रदीप नादरगे यांनी कुंचल्यातून तंबाखू विरोधी दिनाबद्दल जनजागृती करणारी विविध चित्रे रेखाटली आहेत.

नादरगे यांनी विविध सामाजिक आशय घेऊन चित्रे रेखाटली आहेत. प्रत्येक पालकास आपला मुलगा कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये, असे वाटते. परंतु, घरी आपणच तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करीत असाल तर मुलेही आपले अनुकरण करून व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन मी करणार नाही, असा संकल्प सर्वांनीच करा, असे आवाहन नादरगे यांनी केले आहे. कुंचल्यातून त्यांनी तंबाखूचे दुष्परिणाम सांगितले आहेत.

Web Title: Awareness for not using tobacco made from brushes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.