चित्ररथ, पथनाट्याद्वारे महावितरणची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST2021-03-14T04:19:07+5:302021-03-14T04:19:07+5:30
या उपक्रमाद्वारे ऊर्जापर्वाच्या माहितीसह वेळेवर वीज बिले भरण्याबाबत जनजागृती केली जात आहे. महिला दिनानिमित लातुरातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून महाकृषी ऊर्जा ...

चित्ररथ, पथनाट्याद्वारे महावितरणची जनजागृती
या उपक्रमाद्वारे ऊर्जापर्वाच्या माहितीसह वेळेवर वीज बिले भरण्याबाबत जनजागृती केली जात आहे. महिला दिनानिमित लातुरातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून महाकृषी ऊर्जा पर्वाची सुरुवात झाली. शिवशाहीर संतोष साळुंखे यांच्या कलापथकाद्वारे ऊर्जा पर्वाचा जागर करण्यात येत आहे. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कार्यकारी अभियंता गणेश सामसे, उपकार्यकारी अभियंता जनार्दन कसपटे, अभियंता शिवाजी रेड्डी आदींसह महावितरणच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
गावोगावी जाऊन पथनाट्याचे सादरीकरण...
लातूर शहरासह हरंगुळ, काडगाव, गाधवड, शिराळा, मुरुड, बोरगाव काळे, एकुरगा, गंगापूर, महापूर, सिंधगाव, पोहरेगाव, भोकरंभा, रेणापूर, पानगाव, खरोळा, भातांगळी, ममदापूर, बोरी आदी गावांत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले असून, गावोगावी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.