लामजना येथे जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:20 IST2021-04-20T04:20:44+5:302021-04-20T04:20:44+5:30
यावेळी किल्लारी ठाण्याचे अमोल गुंडे, लामजन्याचे बिट जमादार सचिन उस्तुर्गे, सरपंच खंडेराव फुलारी, उपसरपंच बालाजी पाटील, सदस्य नजीर ...

लामजना येथे जनजागृती मोहीम
यावेळी किल्लारी ठाण्याचे अमोल गुंडे, लामजन्याचे बिट जमादार सचिन उस्तुर्गे, सरपंच खंडेराव फुलारी, उपसरपंच बालाजी पाटील, सदस्य नजीर पटेल, महेश सगर, राम पवार, राम कांबळे, ॲन्टी कोरोना फोर्सचे महेश बनसोडे, उमेश शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी हणमंत कांबळे, युनूस कारभारी, फराज कारभारी, सिद्धेश्वर चिल्ले, दीपक राठोड, वैभव बालकुंदे, जीवन जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी घरोघरी जाऊन नागरिकांना कोरोना संसर्गाची माहिती दिली. तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले.
नागरिकांनी काळजी घ्यावी...
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रत्येकाने स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. अनावश्यक घराबाहेर पडल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे किल्लारी ठाण्याचे अमोल गुंडे म्हणाले.