जिल्ह्यातील १२० गावात जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:20 IST2021-02-16T04:20:55+5:302021-02-16T04:20:55+5:30
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे, लेखापाल अशोक माळगे, दिलीप वाठोरे यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात चित्ररथाव्दारे ८० तर ...

जिल्ह्यातील १२० गावात जनजागृती मोहीम
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे, लेखापाल अशोक माळगे, दिलीप वाठोरे यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात चित्ररथाव्दारे ८० तर एलईडी व्हॅनव्दारे ४० अशा एकूण १२० गावांत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या जनजागृतीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये लातूर तालुक्यातील रामेश्वर, भातांगळी, आर्वी, गंगापूर, हरंगूळ (बु.), बोपला, जवळा (बु) एकुरगा, निवळी. औसा तालुक्यताील कारला,बोरगाव (बु.) उटी (बु) दावतपूर,तावशी ताड, लिंबाळा दाऊ, गुबाळ, उजनी,माळकोंडजी, टाका, मातोळा, लामजना, आशिव,किल्लारी बेलकुंड निलंगा तालुक्यातील अन्सारवाडा, गौर, हंद्राळ, ताडमुगळी, औरादशहाजानी, अंबुलगा (बु), निटूर, पानचिंचोली, कासारशिरसी, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, धामनगाव, लक्कडजवळगा, अंकुलगा, दैठणा, भिंगोली, डिगोळ उदगीर तालुक्यातील वायगाव, करडखेड, तोंडार,चांदेगाव, चिमाची वाडी, हंडरगुळी तर चाकूर तालुक्यातील म्हाळंगी, घरणी, नळेगाव, वडवळ नागनाथ, कबनसांगवी, नागेशवाडी, अहमदपूर तालुक्यातील कोपरा, टाकळगांव (का), सावरगाव रोकडा, हडोळती, शिरुरताजबंद, किनगाव रेणापूर तालुक्यातील सांगवी, पानगाव, खरोळा, कोरेपूर, पोहरेगाव,कोष्टगांव तर देवणी तालुक्यातील वलांडी, इस्माईलवाडी, जवळगा, डोंगरवाडी, संगम, विलेगाव, सावरगाव, अचवला आणि जळकोट तालुक्यातील अतनुर, वंजारवाडा, गुट्टी, घोणसी, धामनगाव, रावणकोला, पाटोदा या गावांचा समावेश असल्याचे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सांगण्यात आले.