खंडेराव कुलकर्णी यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST2021-03-01T04:22:27+5:302021-03-01T04:22:27+5:30
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती अनुदान मंडळाच्या वतीने राज्य वाड्मय पुरस्कार योजनेंतर्गत दिला जाणारा नरहर कुरुंदकर पुरस्कार खंडेराव कुलकर्णी यांच्या ...

खंडेराव कुलकर्णी यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती अनुदान मंडळाच्या वतीने राज्य वाड्मय पुरस्कार योजनेंतर्गत दिला जाणारा नरहर कुरुंदकर पुरस्कार खंडेराव कुलकर्णी यांच्या ‘मराठी व्याकरण:स्वरूप व चिकित्सा’ या ग्रंथास जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुडसूर येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले असून, त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक मंडळाच्या माध्यमातून राज्यातील मराठीच्या शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. या पुरस्काराबद्दल ज्येष्ठ साहित्यिक प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, प्रा.डॉ. दिनकर कुलकर्णी, रमेश अंबरखाने, डॉ. संग्राम पटवारी, प्रा.डॉ. राम तोंडारे, अप्पाराव कुलकर्णी, विश्वनाथ मुडपे, एन.टी. ढोणे, प्रा.डॉ .राजकुमार मस्के, धनंजय गुडसूरकर आदींनी अभिनंदन केले आहे.