औसा शिक्षक पतसंस्थेने पारदर्शक कारभाराचा पायंडा पाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST2021-03-09T04:22:04+5:302021-03-09T04:22:04+5:30
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक सभासद, गुणवंत सभासद पाल्यांचा आणि संस्थामित्र शिक्षक सभासदांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष ॲड. काकडे म्हणाले, औसा ...

औसा शिक्षक पतसंस्थेने पारदर्शक कारभाराचा पायंडा पाडला
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक सभासद, गुणवंत सभासद पाल्यांचा आणि संस्थामित्र शिक्षक सभासदांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष ॲड. काकडे म्हणाले, औसा शिक्षक सहकारी पतसंस्था ही संस्था स्थापनेचे सर्व उद्देश पूर्ण करत असल्यानेच सभासदांनी संचालक मंडळावर विश्वास ठेवून गुंतवणूक वाढविली आहे. पतसंस्था कसलेही नियमबाह्य कामे करत नाही, यापुढे ही संस्थेने आपले जास्तीत जास्त भांडवल निर्माण करावे, असेही ते म्हणाले. संस्थेच्या विस्तारित इमारत उद्घाटन कार्यक्रमाला माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी कामकाज पाहून समाधान व्यक्त केले आहे. प्रास्ताविकात संस्थेचे चेअरमन महादेव खिचडे यांनी संस्थेचा आर्थिक लेखा-जोखा मांडला.
सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष हरीश आयतनबोने यांनी केले. आभार संस्थेचे सचिव संजय जगताप यांनी केले. या ऑनलाईन वार्षिक सभेच्या यशस्वीतेसाठी संचालक दीपक डोंगरे, युसूफ पिरजादे, गोवर्धन चपडे, संजय रोडगे, सोमनाथ कांबळे, दत्तात्रय दंड्गुले, मधुकर गोरे, मीराताई कुलकर्णी, उर्मिलाताई सोनटक्के यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अधिक परिश्रम घेतले.