औराद शहाजानीच्या ग्रामीण रुग्णालयात लवकरच ऑक्सिजनयुक्त ३० खाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST2021-05-06T04:20:41+5:302021-05-06T04:20:41+5:30
औराद शहाजानीतील ग्रामीण रुग्णालयाची त्यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली. तसेच ...

औराद शहाजानीच्या ग्रामीण रुग्णालयात लवकरच ऑक्सिजनयुक्त ३० खाटा
औराद शहाजानीतील ग्रामीण रुग्णालयाची त्यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली. तसेच तत्काळ आवश्यक साहित्य, औषधी व इतर बाबींच्या पूर्ततेसाठी संबंधितांना सूचना केल्या. जलद गतीने लसीकरणासाठी लसींचा साठा उपलब्ध करून देण्याकरिता माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांशी बोलले असल्याचेही ते म्हणाले. शासनाकडे पाठपुरावा करून लस उपलब्ध करून घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर कदम व डॉ. वैभव कांबळे यांनी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्यास आठ दिवसांत ३० ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष भारतबाई साळुंके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम, सपोनि. सुधीर सूर्यवंशी, भाजप तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, शहराध्यक्ष राजा पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र आगरे, रज्जाक रक्साळे, रमेश थेटे आदी उपस्थित होते.