हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे स्टेट बँकने एटीएम सेवा सुरु केल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
हाळी हंडरगुळी हे बाजारचे गाव असल्याने परिसरातील १५ ते २० गावांमधील नागरिकांचा येथे दैनंदिन संपर्क असतो. याशिवाय शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था याठिकाणी आहेत. जिल्हा बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखांवर गावासह परिसरातील ग्राहक अवलंबून आहेत. मात्र, याठिकाणी राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा व एटीएम नसल्याने उदगीर, अहमदपूर येथे जावे लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असे. याविषयी ‘लोकमत’मधून वारंवार वृत्त प्रकाशित करण्यात आल्याने स्टेट बँकेने येथे आपली एटीएम सेवा सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.