आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST2021-01-04T04:17:48+5:302021-01-04T04:17:48+5:30

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व पंचायत समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास सीईओ अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, ...

Asha Swayamsevika, the pride of the group promoters | आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचा गौरव

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचा गौरव

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व पंचायत समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास सीईओ अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.आर. शेख, डॉ. एस.एस. हिंडोळे, डॉ. अंगद जाधव उपस्थित होते. यावेळी सीईओ गोयल म्हणाले, आशा स्वयंसेविकांनी आरोग्याच्या कामाबरोबर स्वत: सशक्त होऊन आपल्या मुलांना उच्चशिक्षित करावे. आशा स्वयंसेविका प्रसूतीसाठी दवाखान्यात गेले असता त्यांच्या निवासासाठी आशा कक्षाची निर्मिती करण्यात येईल व संरक्षणाची जबाबदारी घेण्यात येईल, असे म्हणाले. यावेळी डॉ. परगे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. आर. आर. शेख यांनी केले. सूत्रसंचालन आरोग्यसेविका कल्पना दुरुगकर यांनी केले. यशस्वीतेसाठी मोरे, टाकेकर, देशमुख पटेल यांनी परिश्रम घेतले.

प्रशस्तिपत्र देऊन सत्कार

यावेळी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात बेटी बचाव, कोरोना महामारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी, आशा स्वयंसेविकांची कामे अशा प्रकारचे संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढण्यात आल्या. तसेच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावेळी २१ आशा स्वयंसेविका व चार गटप्रवर्तकांचा मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Web Title: Asha Swayamsevika, the pride of the group promoters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.