अरविंद पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST2021-03-10T04:20:46+5:302021-03-10T04:20:46+5:30
प्रारंभी निलंगा शहराचे आराध्यदैवत श्री नीळकंठेश्वर मंदिरात नगराध्यक्ष, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी अभिषेक केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब ...

अरविंद पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस साजरा
प्रारंभी निलंगा शहराचे आराध्यदैवत श्री नीळकंठेश्वर मंदिरात नगराध्यक्ष, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी अभिषेक केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचबराेबर पीरपाशा दर्गा व हजरतअली दर्गा येथे चादर चढविण्यात आली. त्यानंतर युवा नेते अरविंद पाटील-निलंगेकर यांनी खरोसा येथील देवीचे दर्शन घेतले. तर शिरूर अनंतपाळ येथील देवस्थान, देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथे त्यांनी दर्शन घेतले. शिरूर अनंतपाळ येथे ॲड. संभाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी शिरुर अनंतपाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मंगळवारी सकाळी निवासस्थानी कार्यकर्त्यांनी सत्कारासाठी हजेरी लावली हाेती. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, डॉ. लालासाहेब देशमुख, माजी सभापती अजित माने, शेषराव ममाळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, डॉ. एम.एन. कुडंबले, जिल्हा परिषद सदस्य संजय दोरवे, शाहूराज थेटे, श्रीमंत जाधव, गजानन देशमुख, तानाजी पाटील, महेश सोळुंके, नागनाथ नाईकनवरे, अभिजीत सोळुंके चांदोरीकर, जि. प. सदस्य ज्ञानेश्वर बरमदे, जि. प. सदस्य धोंडीराम बिराजदार, दयानंद निलंगेकर, माजी जि.प. अध्यक्ष मिलिंदअप्पा लातूरे, जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अरुण साळुंके, माजी चेअरमन डी.एस. धुमाळ, आनंद जाधव यांच्यासह कार्यकर्ते, हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.