लेख (जाहीरात पुरस्कृत)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:26 IST2021-02-05T06:26:36+5:302021-02-05T06:26:36+5:30

कोणताही उद्योग, व्यवसाय उभारताना, तो पुढे नेताना जिद्द, संयम आणि ध्येय असले पाहिजे. कोणी चांगले म्हटले, स्तुती केली म्हणजे ...

Articles (Advertising Sponsored) | लेख (जाहीरात पुरस्कृत)

लेख (जाहीरात पुरस्कृत)

कोणताही उद्योग, व्यवसाय उभारताना, तो पुढे नेताना जिद्द, संयम आणि ध्येय असले पाहिजे. कोणी चांगले म्हटले, स्तुती केली म्हणजे हुरळून जाऊ नये अन् टीका केली म्हणून खचूनही जाऊ नये. जे पाणी धावते असते, त्याला मार्ग सापडतो. अर्थात्, आयुष्याला साचलेपण येऊ नये म्हणून सतत प्रयत्नवादी असले पाहिजे, असा विचार मनाशी बाळगून वाटचाल करणाºया माधुरी बाळासाहेब पाटील यांची व्यवसायातील धडाडी प्रेरणादायी आहे.

सौ. माधुरी यांचे सासर आणि माहेर लातूरचेच. माधुरी महारुद्रअप्पा सगरे यांचा विवाह बाळासाहेब संगनगौडा पाटील यांच्याशी झाला. त्या गेल्या २८ वर्षांपासून लातूरमध्ये वास्तव्याला आहेत. शालेय शिक्षण देशिकेंद्र विद्यालयात, महाविद्यालयीन शिक्षण बसवेश्वर महाविद्यालयात तर पुणे येथून हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, कुकिंग क्लासेसही केले आहे. शिक्षणाबरोबरच व्यवसायाचं आणि काटकसरीचं बाळकडू त्यांना आईपासून मिळाले. दोन कुटुंबांना एकत्र आणणारा, विवाह संस्था बळकट करणारा मंगल कार्यालयाचा व्यवसाय त्यांनी निवडला. लातूरमधील प्रसिद्ध पाटील प्लाझा उभारून लातूरमध्ये मंगल कार्यालयाची परंपरा सुरू करण्याचा बहुमान त्यांच्याकडे जातो. त्यातही एक महिला मंगल कार्यालय चालविते, असे हे एकमेव मंगल कार्यालय आहे. २२ वर्षांपासून असंख्य आनंदसोहळे लातूरकरांनी पाटील प्लाझामध्ये अनुभवले आहेत. त्यांच्या व्यवसायाला आणि कष्टाला पाठबळ देणारे त्यांचे पती बाळासाहेब पाटील सिव्हील इंजिनिअर आहेत. मुलगी प्रणिता, मुलगा प्रवीण यांच्यासह सासू, कै. सासरे तसेच माहेरहू लातूरचेच असल्याने आई, कै. वडील, बहीण, मेहुणे, भाऊ, भावजयी यांचा सतत पाठिंबा त्यांना मिळाला आहे. सौ. माधुरी पाटील यांनी आपल्या कर्म-यांप्रती सतत कृतज्ञता व्यक्त करतात.

पाटील प्लाझा हा केवळ व्यवसाय न राहता एक सामाजिक बांधिलकी म्हणून सौ. माधुरी पाटील यांनी काम केले आहे. गरजूंना मदत केली आहे. सरस्वती बहुउद्देशीय महिला मंडळाही त्या कार्यरत होत्या. अंध मुलांना तसेच त्यांच्या स्पर्धा आणि निवासासाठी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्याची दखल विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी घेऊन पत्राद्वारे गौरव केला होता.

आजवर लातूरकरांनी भरभरून प्रेम दिले. पुढेही ते मिळत राहावे, अशी प्रांजळ भावना माधुरी पाटील व्यक्त करतात.

Web Title: Articles (Advertising Sponsored)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.