वलांडी उपकेंद्राअंतर्गत कृषिपंपाची २७ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST2021-03-19T04:18:42+5:302021-03-19T04:18:42+5:30
येथील ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी वीजबिलासंदर्भात घरगुती, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ...

वलांडी उपकेंद्राअंतर्गत कृषिपंपाची २७ कोटींची थकबाकी
येथील ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी वीजबिलासंदर्भात घरगुती, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी विष्णू माने, माजी सरपंच रामभाऊ भंडारे, उपसरपंच महेमुद सौदागर, नागेश बनाळे, सूर्यकांत वाघमारे, धनराज बनसोडे, मुश्ताक कादरी, रवि स्वामी, रवि गायकवाड, वीज कर्मचारी बावगे, नितीन वाघमारे, इस्माईल शेख आदी उपस्थित होते. यावेळी शाखा अभियंता संदीप भराट म्हणाले, वलांडी उपकेंद्राअंतर्गत घरगुती आणि व्यावसायिक वीजबिलापोटी ९१ लाख १६ हजार थकित आहेत. कृषिपंपाचे वीज बिल २७ कोटी २८ लाख ४३ हजार रुपये थकित आहे. दरम्यान, घरगुती आणि व्यावसायिक वीजग्राहकांकडून चालू महिन्यात काही वसुली करण्यात आली आहे. शेतीपंपाचे ५ लाख रुपये वसूल झाले आहेत.
महावितरण सध्या आर्थिक अडचणीत आहे. वीज ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा वेळेवर केल्यास लाभदायक होईल. त्यामुळे वीजबिल भरणा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी वलांडी येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवर स्वतंत्र डीपीची व्यवस्था करून देण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी भराट यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.