एप्रिल ठरणार ‘ताप’दायक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST2021-04-03T04:16:47+5:302021-04-03T04:16:47+5:30
शुक्रवारी - ३९ गत आठवड्यात लातूर जिल्ह्यातील तापमान ३६ ते ३८ अंशाच्या घरात हाेते. दाेन आठवड्यापूर्वी वातावरणात बदल झाल्याने, ...

एप्रिल ठरणार ‘ताप’दायक !
शुक्रवारी - ३९
गत आठवड्यात लातूर जिल्ह्यातील तापमान ३६ ते ३८ अंशाच्या घरात हाेते. दाेन आठवड्यापूर्वी वातावरणात बदल झाल्याने, ढगाळ वातावरण हाेते. या कालावधीत तापमान ३५ अंशावर हाेते. वातावरण बदल्याने पुन्हा पारा ३५, ३६, ३७, ३८ आणि ३९ अंशाच्या घरात पाेहचला. शुक्रवारी हाच पारा ३९ अंशावर हाेता.
लातूर जिल्ह्यात असा राहिल आठवाडा...
एप्रिल आणि मे महिन्यात लातूर जिल्ह्यातील तापमानात वाढ हाेते. मार्चपासूनच उन्हाचा पारा टप्प्या-टप्प्याने वाढताे. हा दरवर्षीचा अनुभव आहे. यंदाही एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात तापमान वाढले आहे. शुक्रवारी तापमानाचा पारा ३९ अंशावर हाेता. येणाऱ्या आठवड्यात हाच पारा ४० अंशावर पाेहचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एप्रिलचा शेवटचा आणि मे महिन्याचा पहिला आठवाडा ‘ताप’दायक असणार आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात तापमानचा टक्का वाढार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी नागरिक सकाळी ११ आणि सायंकाळी ६ नंतरच घराबाहेर पडत आहे.