करवंदी येथे दारुविक्री बंदीचा ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST2021-03-29T04:13:37+5:302021-03-29T04:13:37+5:30
उदगीर तालुक्यातील करवंदी गावात गत अनेक वर्षांपासून खुलेआम दारू विक्री होत आहे. यातून गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण ...

करवंदी येथे दारुविक्री बंदीचा ठराव मंजूर
उदगीर तालुक्यातील करवंदी गावात गत अनेक वर्षांपासून खुलेआम दारू विक्री होत आहे. यातून गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ विनापरवाना दारुविक्रीमुळे गावात भांडण-तंटे सुरु आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर येतील, अशी भीती निर्माण झाली आहे. करवंदी गावाला येणाऱ्या काळात आदर्श गाव म्हणून, पाहायचे असेल तर गावात होणारी अवैध दारुविक्री तात्काळ थांबवावी लागेल. या विषयावर सर्वांनी चर्चा केली. यात भालेराव, जाधव, विजयकुमार चव्हाण, उपसरपंच शाहू चव्हाण, शालूबाई नरवटे, रमाबाई सूर्यवंशी, मारोती नरवटे, अजित जाधव, परमेश्वर गायकवाड, वैजनाथ सूर्यवंशी, प्रभू मेहत्रे, तुकाराम बिरादार, जयवंत सूर्यवंशी, किशोर चव्हाण, मोहन बिरादार, साहेबा वाघे, उमेश बेलुरे, राम वाघे, बाळासाहेब जाधव, यशवंत बिरादार आदी नागरिक सहभागी होते. सर्वानुमते गावात दारुविक्री बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. याची अंमलबजावणी तातडीने सुरु करण्याबाबत देवणी पाेलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. ठरावाला सूचक म्हणून सुग्रीव सूर्यवंशी आणि अनुमोदक म्हणून विनायक गायकवाड होते. प्रशासकीय कामकाज ग्रामविकास अधिकारी भारत कांबळे यांनी पाहीले. हा ठराव मंजूर केल्याबद्दल माजी विस्तार अधिकारी आर.डी. जाधव, डॉ. किशोर जाधव, प्रा. दयानंद जाधव, व्यंकटराव बिरादार यांनी गावकऱ्यांचे काैतुक केले आहे.