उदगीर एमआयडीसीला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:27+5:302021-03-06T04:19:27+5:30
उदगीर हे लातूर जिल्ह्यातील एक व्यापारी शहर आहे. या शहरात एमआयडीसी स्थापना व्हावी, अशी येथील व्यापारी व जनतेची मागणी ...

उदगीर एमआयडीसीला मंजुरी
उदगीर हे लातूर जिल्ह्यातील एक व्यापारी शहर आहे. या शहरात एमआयडीसी स्थापना व्हावी, अशी येथील व्यापारी व जनतेची मागणी होती. शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता. उदगीर औद्योगिक क्षेत्र स्थापना करण्यासाठी मौजे सुलढाणा, कासराळ व लिमगाव येथील १०८.२५ आर. क्षेत्रात मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. उदगीर एमआयडीसीच्या स्थापनेमुळे स्थानिक औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल. तसेच बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबतच स्थानिक व्यापाऱ्यांना एका कच्च्या मालाची बाजारपेठ उपलब्ध होईल, अशी माहिती पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली. यावेळी राज्य शासनाने उदगीर येथे औद्योगिक वसाहतीस मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आभार मानले.