चाकूरातील केंद्रीय विद्यालयात पहिली ते आठवीच्या तुकडी वाढीस मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST2021-09-15T04:24:33+5:302021-09-15T04:24:33+5:30

केंद्रीय विद्यालय येथे नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. केंद्रीय विद्यालयाकडून वर्ग १ ते १० पर्यंत नवीन वर्ग व ...

Approval for increase of 1st to 8th batch in Kendriya Vidyalaya, Chakura | चाकूरातील केंद्रीय विद्यालयात पहिली ते आठवीच्या तुकडी वाढीस मंजुरी

चाकूरातील केंद्रीय विद्यालयात पहिली ते आठवीच्या तुकडी वाढीस मंजुरी

केंद्रीय विद्यालय येथे नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. केंद्रीय विद्यालयाकडून वर्ग १ ते १० पर्यंत नवीन वर्ग व विभाग सुरू करण्यासाठी संबंधिताकडे खा. सुधाकर शृंगारे यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित करून व केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सीमा सुरक्षा दल केंद्रीय विद्यालयात १ ते १० वी वर्ग व नवीन इमारतीत प्रत्येक विभाग वाढविण्यासाठी मागणीसुद्धा केली होती. या मागणीत लोकसभा मतदारसंघातील चाकूर स्थित केंद्रीय विद्यालयात अनेक विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र आहेत. परंतु विद्यार्थी व वर्गखोल्यांची क्षमता कमी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे शक्य होत नव्हते. खासदार शृंगारे यांनी इयत्ता १ ते १० वीपर्यंतच्या प्रत्येक वर्गात एक विभाग वाढवावा, अशी मागणी केली होती. परंतु, जागेचा अभावामुळे ते शक्य नसल्याचे सांगण्यात आले होते. सध्यस्थितीत केंद्रीय विद्यालयात नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. नवीन इमारतीत ही शाळा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. नवीन इमारतीत पुरेसा विभाग व वर्गखोल्या उपलब्ध आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून १ ते ८ वर्गाच्या तुकडी सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. चाकूर व परिसरातील विद्यार्थ्यांना तुकडी वाढीमुळे फायदा होईल, असा विश्वास खा. सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केला.

Web Title: Approval for increase of 1st to 8th batch in Kendriya Vidyalaya, Chakura