जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती पांडे व शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढून केंद्राचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती मन्मथअप्पा किडे, पंचायत समितीचे सभापती बालाजी ताकबिडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूराव जाधव, तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ पवार, युवक काँग्रेसचे सरचिटणीस संग्राम नामवाड, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास मंगनाळे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी, बालाजी बनसोडे, प्रदीप राठोड, रियाज सय्यद, सरपंच सत्यवान पाटील, काशीनाथ केंद्रे, ईश्वर बेंबरे, मारोती चव्हाण, दिलीप पांचाळ, संभाजी मोरे, विश्वनाथ जाधव, ज्ञानोबा पवार, मुर्तुज तांबोळी, राजीव वाघमारे, प्रा. राजेंद्र वाघमारे, मुस्सा सय्यद, अनिल सोनकांबळे, गणेश चिखले, बालाजी पाटील, संदीप उगिले, मधुकर हलकरे, सोनू मगर, प्रमोद दाडगे, रवी नामवाड, महेश पाटील आदी उपस्थित होते.
जळकोटात सायकल रॅली काढून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST