शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

आधीच दुष्काळ त्यात बाष्पीभवन वेगात; 'मांजरा'तील १९.१८ दलघमी पाण्याची आतापर्यंत वाफ!

By हणमंत गायकवाड | Published: April 18, 2024 6:23 PM

उष्णता वाढल्याने दररोज ८.५० मिलिमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे

लातूर : उन्हाचा पारा दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने साठवण तलावातील पाण्याची वाफ (बाष्पीभवन) मोठ्या प्रमाणात होत आहे. मांजरा प्रकल्पातील दररोज ८.५० मिलिमीटर पाणी बाष्पीभवनामुळे घटत आहे. उष्णतेमुळे गेल्या चार-पाच महिन्यात १९.१८ दलघमी पाण्याची वाफ झाली आहे. म्हणजे बाष्पीभवन झाले आहे. सध्या मांजरा प्रकल्पावर पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी कोणतीच उपाय योजना नसल्यामुळे दररोज ८.५० मिलीमीटर पाण्याची वाफ होत आहे.

लातूर शहरासह लातूर एमआयडीसी,अंबाजोगाई, केज, कळंब धारूर या मोठ्या गावांसह अन्य छोट्या मोठ्या गावांना मांजरा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो.

बाष्पीभवन रोखण्याची उपायोजना खर्चिक उन्हाच्या तीव्रतेमुळे मांजरा प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. मात्र बाष्पीभवन रोखण्यासाठी उपाययोजना नाही. ज्या आहेत, त्या योजना खर्चिक आहेत. इथे ही योजना राबविली जात नाही. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात मांजरा प्रकल्पावर रसायनिक आच्छादन टाकून बाष्पीभवन रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ही योजना दीर्घकाळ राबवली नाही. तथापि,सध्या कोणतीही योजना बाष्पीभवन रोखण्यासाठी नाही.

'मे' अखेरपर्यंत साठा पुरेल सध्या मांजरा प्रकल्पात ५.४० टक्के जिवंत पाणीसाठा आहे. म्हणजे नऊ दलघमी जिवंतपाणी प्रकल्पात आहे. यावर मे अखेरपर्यंत तहान भागू शकते. त्यानंतर मात्र मृतसाठ्याचा वापर करावा लागणार आहे. पावसाळा संपेपर्यंत हे पाणी पुरू शकते.आता उष्णतेच्या लाटेमुळे मांजरा प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रकल्पातील पाण्याची वाफ होऊन पाणी हवेत जिरत आहे. त्यावर काहीच उपायोजना नाही, हे सत्य. यातून जुलै २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत १९.१८ दलघमी पाणी बाष्पीभवनात विरले आहे.

मांजरातील पाण्याचे सहा महिन्यात असे झाले बाष्पीभवन....ऑक्टोबर : २.२१नोव्हेंबर : २.२९डिसेंबर : २.१२जानेवारी : २.२८फेब्रुवारी :  २.४४मार्च : ३.५० दलघमी

पाण्याचे बाष्पीभवन म्हणजे  काय ?उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे या प्रक्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. बाष्पीभवन हा जलचक्राचा एक भाग आहे.सूर्य (सौर ऊर्जा), समुद्र, तलाव, जमिनीतील ओलावा आणि पाण्याचे इतर स्त्रोतांमधून पाण्याचे बाष्पीभवन करतो.पाण्याचे बाष्पीभवन जेव्हा द्रवाची पृष्ठभाग उघडकीस येते तेव्हा रेणू बाहेर पडतात आणि पाण्याची वाफ तयार करतात;ही वाफ नंतर वर येऊन ढग तयार करू शकते.पुरेशी उर्जा असल्यास, द्रव वाफेत बदलते.

ढगाळ वातावरणामुळे दोन दिवसांपासून बाष्पीभवन कमीउन्हामुळे मांजरा प्रकल्पातील पाण्याचे दररोज ८.५० मिलिमीटर बाष्पीभवन होत आहे. ढगाळ वातावरणामुळे गेल्या दोन दिवसांपासून पाण्याची वाफ थोडी कमी झाले आहे.- सुरज निकम, शाखा अधिकारी मांजरा प्रकल्प, धनेगाव

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणWaterपाणीlaturलातूर