भेटीगाठीसाेबतच मदतही ओसरली, वृद्धाश्रमात आजी-आजाेबा एकाकी ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:21 IST2021-04-20T04:21:01+5:302021-04-20T04:21:01+5:30
...अन् मदतही ओसरली लातूर शहरालगत असलेल्या वृद्धाश्रमात विविध भागांतून आलेल्या आजी-आजाेबांच्या वास्तव्याची साेय करण्यात आली आहे. अनेक जण या ...

भेटीगाठीसाेबतच मदतही ओसरली, वृद्धाश्रमात आजी-आजाेबा एकाकी ।
...अन् मदतही ओसरली
लातूर शहरालगत असलेल्या वृद्धाश्रमात विविध भागांतून आलेल्या आजी-आजाेबांच्या वास्तव्याची साेय करण्यात आली आहे. अनेक जण या वृद्धाश्रमाला प्रत्यक्ष भेट देत आजी-आजाेबांसाेबत मुलाबाळांचा वाढदिवस साजरा करतात, तर काही कुटुंब भाेजन, साहित्याची भेट देण्यासाठी दाखल हाेतात. मात्र, काेराेनाने गत मार्चपासून या भेटी आणि मदतीचा ओघ काही प्रमाणात ओसरला आहे. असे असले तरी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनाने खबरदारी घेतली आहे. नियमित उपक्रम, नाश्ता, भाेजन आणि औषधी व आराेग्य तपासणी सुरूच आहे. प्रत्येक आजी-आजाेबाची विशेष काळजी घेतली जात आहे.
भेट देणाऱ्यांची संख्या आली शून्यावर...
वृद्धाश्रमाला भेट देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि नातेवाइकांची संख्या माेठी हाेती. दरम्यान, काेराेना महामारीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठीवर परिणाम झाला आहे. काळजी म्हणून या भेटीगाठीवर वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनानेच निर्बंध आणले आहेत. मार्च २०२० ते मार्च २०२१ या वर्षभरातील भेट देणाऱ्यांची संख्या शून्यावर आली आहे.