मुरुड रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:24 IST2021-08-20T04:24:23+5:302021-08-20T04:24:23+5:30
तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुरुड रेल्वे स्थानकावर लातूर-मुंबईसह इतर रेल्वे गाड्यांना थांबा दिला होता; परंतु लाॅकडाऊन झाल्यापासून ...

मुरुड रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा द्यावा
तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुरुड रेल्वे स्थानकावर लातूर-मुंबईसह इतर रेल्वे गाड्यांना थांबा दिला होता; परंतु लाॅकडाऊन झाल्यापासून येथील रेल्वे थांबा बंद झाला आहे. मुरुड हे ५० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येचे शहर आहे. येथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे येथील व्यापारी पुणे, मुंबई, हैदराबाद येथे दररोज ये-जा करीत असतात. तसेच मुरुड परिसरात २५ कि.मी.च्या अंतरावर साखर कारखाने आहेत. तेथील कर्मचारी तसेच परिसरातील शंभरहून अधिक खेड्यांतील प्रवासी येथे येत असतात. मुरुडला रेल्वे थांबा मिळाल्यामुळे प्रवाशांची सोय झाली होती. पण, सध्या रेल्वेथांबा नसल्यामुळे गैरसोय होत आहे. त्यामुळे येथे रेल्वेथांबा द्यावा. सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर भाजप जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत नागटिळक, शहराध्यक्ष वैभव सापसोड, तालुका संघटनमंत्री अनंत कणसे, भाजप विद्यार्थी आघाडीप्रमुख विशाल कणसे, वैजीनाथ हराळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.