शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लातूर पोलिसांचे ऑल आउट ऑपरेशन; ग्रामपंचायत मतदानाच्या पार्श्वभूमीवर रुट मार्च, ग्रामभेटी

By राजकुमार जोंधळे | Updated: December 16, 2022 19:16 IST

या दरम्यान पोलिसांनी रेकॉर्डवरील ९५ सराईत गुन्हेगारांची झडती घेतली.

लातूर : जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्यामुळे लातूर पोलिसांकडून ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात येत असून, १५ ते १६ डिसेंबर रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत लातूर पोलिसांकडून जिल्ह्यात ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले, तसेच ३५१ गावांना संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन गावात रुट मार्च केला. या कोम्बिंग ऑपरेशनचे आयोजन उपविभागीय स्तरावर करण्यात आले होते. त्यामध्ये गुन्हेगारावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील ३२ अधिकारी, १२८ पोलिस अंमलदारांची अनेक पथके तैनात करण्यात आली होती.

फरार आरोपींना केली अटक...ऑपरेशनच्या दरम्यान, अवैध शस्त्र जप्ती, अग्निशस्त्रे जप्ती, फरार आरोपींना अटक करणे, लॉज व हाॅटेल चेक करणे, पॅरोल आदेशाचे उल्लंघन केलेल्या आरोपींचा शोध घेणे, वाहन तपासणे, अभिलेखावरील गुन्हेगारांचा शोध घेणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे अशा प्रकारच्या कारवाईचा समावेश होता.

१३३ लॉज, हॉटेलची तपासणी...अवैध शस्त्रास्त्र बाळगणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली, तसेच १३३ हॉटेल, लॉज तपासण्यात आले असून, पोलिसांना चकवा देणाऱ्या २६ आरोपींना वारंट बजावून अटक करण्यात आली. जिल्ह्यातील विविध ३८ ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ८७० संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली.

९५ सराईत गुन्हेगारांची झडती...रेकॉर्डवरील ९५ सराईत गुन्हेगारांची झडती घेण्यात आली. गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वत:चे अस्तित्व लपवून दबा धरून बसलेल्या १६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली, तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर २३ गुन्हे दाखल केले. ही मोहीम पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात आली.

३५१ गावात बैठका, संवाद...ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामभेटीमध्ये ठाण्याच्या प्रमुखांनी व बीट अंमलदारांनी ३५१ गावांत बैठका घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. प्रत्येक गावात पोलिस दलातर्फे रुट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीgram panchayatग्राम पंचायत