वीरशैव समाज, उदगीरच्या वतीने संग्राम स्मारक येथील ॲड. धर्मवीर संग्रामप्पा शेटकार सभागृहामध्ये आयोजित वचन सप्ताहामध्ये त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राम मोतीपवळे, तर प्रतिनिधी म्हणून कोषाध्यक्ष सुभाष धनुरे उपस्थित होते.
प्रारंभी महात्मा बसवेश्वर व धर्मवीर ॲड. संग्रामप्पा शेटकार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बडेहवेली म्हणाल्या, अक्का महादेवी या संयम आणि सदाचाराच्या तेजस्विनी होत्या. षड्विकारावर विजय मिळवून त्यांनी वैराग्य वृत्ती स्वीकारली. ईश्वरालाच पतीच्या रूपात पाहिले. अक्का महादेवी यांनी ४३० वचन लिहिले असून, भारतीय इतिहासातील नारी शक्ती होती. त्यांनी आपल्या वचनातून स्त्रियांचा पुरुषी प्रवृत्ती विरुद्धचा संघर्ष आणि त्याचा त्रास व्यक्त केला. मन समाधानी ठेवणे गरजेचे आहे, अशी अक्का महादेवी यांनी आपल्या वचनातून बहुमोल विचारांची देण दिली आहे. उत्तराताई कलबुर्गे यांनी परिचय करून दिला. गुरुप्रसाद पांढरे यांनी आभार मानले.