लातूर : मागील सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांना भेटण्यासाठी गेलेले आमदार आणि कार्यकर्त्यांना त्यांच्याच कारमध्ये बसवून बारामतीतील विकासकामे दाखविली. त्यावेळी अजित पवार यांनी स्टेअरिंग आपल्या हातात घेतले होते, अशी एक वेगळी आठवण बुधवारी समोर आली.
आ. विक्रम काळे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रा. अंकुश नाडे हे बारामतीला गेले होते. उपमुख्यमंत्री आणि आमदार एका कारमध्ये बसत आहेत म्हटल्यावर कार्यकर्ते थोडे दूर झाले. त्यावेळी अजित पवार नेहमीच्या करारी आवाजामध्ये तुम्हाला वेगळे सांगायला पाहिजे का?, बसा कारमध्ये. त्यानंतर त्यांनी बारामतीतील जी वेगवेगळी कामे सुरू होती, त्याची दीड तास पाहणी केली. दुपार झाली. जेवणासाठी पुन्हा उपमुख्यमंत्री आणि आमदार घरात पोहोचले. दोन कार्यकर्ते बाहेर बसलेले. त्यावेळी पुन्हा अजित पवार म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा पुन्हा सांगावे लागते का?, या जेवायला. असे कार्यकर्त्यांना जपणारे नेते होते, अशी आठवण प्रा. नाडे यांनी सांगितली.
अजितदादांचा फोन.. अभय भुतडा यांच्याकडून २६ लाख ४० हजारांची मदतवैद्यकीय शिक्षणाकरिता गरजू विद्यार्थ्यास मदत करण्याकरिता माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले. त्यावेळी अजित पवार यांनी अभय भुतडा यांना फोनवर प्रतिकुल स्थितीतील पालकास मदत करण्याचे आवाहन केले. त्यावेळी अभय भुतडा यांनी तातडीने २६ लाख ४० हजार रुपये वैद्यकीय महाविद्यालयाकडे जमा केले. अशा कितीतरी विद्यार्थ्यांना, गरजूंना अजितदादांकडून मदत झाल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे यांनी सांगितले.
Web Summary : Ajit Pawar personally drove Latur activists around Baramati, showcasing development projects. He also ensured everyone felt welcome, inviting them for meals. Further, he facilitated financial aid for a medical student, highlighting his helpful nature.
Web Summary : अजित पवार ने लातूर के कार्यकर्ताओं को बारामती में घुमाया और विकास परियोजनाओं का प्रदर्शन किया। उन्होंने सभी का स्वागत किया और भोजन के लिए आमंत्रित किया। इसके अतिरिक्त, उन्होंने एक मेडिकल छात्र के लिए वित्तीय सहायता प्रदान की, जो उनकी मददगार स्वभाव को उजागर करता है।