आयुर्वेदाचा प्रचार अन् प्रसाराचे ध्येय (लोकमत सखी मंच ॲचिव्हर्स २०२१ साठी लेख)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:26 IST2021-02-05T06:26:23+5:302021-02-05T06:26:23+5:30
डॉ. गायत्री महानुरे यांचे शालेय शिक्षण श्री केशवराज विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालयातून झाले आहे. त्यानंतर डॉ. ...

आयुर्वेदाचा प्रचार अन् प्रसाराचे ध्येय (लोकमत सखी मंच ॲचिव्हर्स २०२१ साठी लेख)
डॉ. गायत्री महानुरे यांचे शालेय शिक्षण श्री केशवराज विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालयातून झाले आहे. त्यानंतर डॉ. गायत्री यांनी नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातून बी.ए.एम.एस. पूर्ण केले. आयुर्वेदाचे शिक्षण झाल्यानंतर एका रात्रीत अचानक पुण्याला जाण्याचा निर्णय डॉ. गायत्री यांचा टर्निंग पॉइंट ठरला. माधवबाग संस्थेने नुकतीच संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेची सुरुवात केली होती आणि त्यावेळपासूनच डॉ. गायत्री माधवबागसोबत आहेत.
मागील दहा वर्षांपासून डॉ. गायत्री यांनी लातूरच्या राजीव गांधी चौकात माधवबागची शाखा सुरू केली आहे. पूर्वी लातूरमध्येच दुसऱ्या शाखेमध्ये ए.एस.ए. क्लिनिक हेड म्हणून दहा वर्षे काम केले. माधवबागमधून आयुर्वेद आणि आधुनिक निदान पद्धती याचा चांगला उपयोग करून डॉ. गायत्री उत्तम चिकित्सा करीत आहेत. त्यांना आपल्या कामात समाधान मिळते, हे महत्त्वाचे आहे. यश असो की अपयश, त्यात तटस्थ राहणे हा डॉ. गायत्री यांचा स्थायीभाव आहे. त्या यशाने हुरळून जात नाहीत अन् अपयशाने खचतही नाहीत. ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार सेवा देण्यावर त्यांचा अधिक भर असतो. त्यासाठी सुसंवाद महत्त्वाचा ठरतो. प्रत्येकाला त्याच्या शारीरिक स्थितीची आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या पथ्याची माहिती सुलभ देणे आवश्यक असते. उपचारामध्ये डॉक्टरांचा सकारात्मक दृष्टिकोन मोलाचा ठरतो. डॉ. गायत्री यांचाही रुग्णांशी असलेला संवाद आणि दृष्टिकोन प्रशंसनीय आहे.
डॉ. गायत्री यांनी सदैव उत्तम काम करणे, त्या दिशेने पुढे जाणे हेच आदर्श तत्त्व जपले आहे. त्यांना सासरच्या मंडळीकडून आणि माहेरकडून साथ मिळाली आहे. रुग्णसेवा आणि घेतलेल्या निर्णयाला विरोध झाला नाही. प्रामुख्याने पती अर्जुन महानुरे यांनी माधवबागची फ्रेन्चाईसी घेण्याच्या निर्णयाला पाठबळ दिले. इतकेच नव्हे त्यांच्या संस्थेतील क्लिनिक मॅनेजमेंट तेच बघतात. डॉ. गायत्री यांनी आपली शाखा सांभाळताना गुणवत्तापूर्ण काम केले आहे. त्यामुळेच माधवबाग संस्थेच्या कार्यक्रमात २०१३ चा व २०१५ चा बेस्ट क्लिनिक हेड मराठवाडा पुरस्कार त्यांना मिळाला, तसेच २०१७ मध्ये बेस्ट क्लिनिक आणि बेस्ट क्लिनिक मॅनेजमेंटचा पुरस्कारही त्यांनी मिळविला. पुढच्या काळातही आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करावा. लोकांमध्ये हृदयरोगाविषयी, मधुमेहासंदर्भाने जनजागरण करावे किंबहुना हृदयरोग आणि मधुमेहमुक्त कुटुंब या दिशेने काम करावे, ही डॉ. गायत्री यांची तळमळ आहे.
- डॉ. गायत्री अर्जुन महानुरे