अहमदपूर आगाराला दिवसाला पाच लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:26+5:302021-06-19T04:14:26+5:30

गावोगावी धावतेय बस... राज्याची लोकवाहिनी म्हणून परिचीत असलेल्या लालपरीलादेखील कोरोना काळात तोटा सहन करावा लागला. आता गाडी रूळावर येत ...

Ahmedpur depot earns Rs 5 lakh per day | अहमदपूर आगाराला दिवसाला पाच लाखांचे उत्पन्न

अहमदपूर आगाराला दिवसाला पाच लाखांचे उत्पन्न

गावोगावी धावतेय बस...

राज्याची लोकवाहिनी म्हणून परिचीत असलेल्या लालपरीलादेखील कोरोना काळात तोटा सहन करावा लागला. आता गाडी रूळावर येत असून, दिवसाला ५ लाखांचे उत्पन्न येत आहे. एसटीचा प्रवास सुरळीत प्रवास म्हणून ओळखला जातो. त्यामुळे प्रवासी एसटीच्या प्रवासाला पसंती देतात. गतवर्षी आणि चालू वर्षात करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे अहमदपूर आगाराला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. आता लॉकडाऊन शिथिल केल्याने अहमदपूर आगारातून दिवसाकाठी ३१२ फेऱ्या सोडण्यात येत असून, सुमारे २१ हजार किलोमीटरचे अंतर आगारातील बस कापत आहेत.

प्रतिसाद मिळेल तशी फेऱ्यांमध्ये वाढ...

अहमदपूर आगारातून ग्रामीण भागासह पुणे, शिवाजीनगर, स्वारगेट, औरंगाबाद, सोलापूर, बुलडाणा, अक्लकोट, गंगाखेड, मुखेड, उदगीर, लातूरसह एकूण ५८ बसेस मार्गस्थ होत आहेत. ३१२ फेऱ्या सुरू आहेत. सध्या तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पेरणी होताच प्रवाशांचा प्रतिसाद आणखीन मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. लातूर जिल्हाअंतर्गत जिल्हा ते तालुका या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल, तशा बसच्या फेऱ्या वाढवण्यात येत आहेत. - एस. जी. सोनवणे, आगारप्रमुख, अहमदपूर.

Web Title: Ahmedpur depot earns Rs 5 lakh per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.