जलकुंभावर चढून प्रहारचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST2021-03-27T04:20:14+5:302021-03-27T04:20:14+5:30
जिल्हा उपाध्यक्ष राजभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या तालुका शाखेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. रेणापूर नगरपंचायतअंतर्गत सुरु असलेली ...

जलकुंभावर चढून प्रहारचे आंदोलन
जिल्हा उपाध्यक्ष राजभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या तालुका शाखेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. रेणापूर नगरपंचायतअंतर्गत सुरु असलेली विविध विकास कामे ही नगरपंचायत प्रशासन व पदाधिका-यांचा संगनमताने होत आहेत. अनागोंदी कारभार सुरु आहे. शहरात करण्यात आलेले रस्ते, नाली, स्वच्छतागृहे आदी कामे निकृष्ट दर्जाची असून सदरील कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ राठोड यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिका-यांच्याकडे केली आहे.
घरकुल योजनेअंतर्गत योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. ज्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला, त्यांच्याकडून शौचालयाच्या नावाखाली १२ हजारांची कपात करुन घेतले जात आहेत. तसेच शहरात स्वच्छतेच्या नावावर लाखो रुपये खर्चूनही शहरातील अनेक ठिकाणी असलेल्या उघड्या गटारींमुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे रोगराईची भीती व्यक्त होत आहे. शहरातील सार्वजनिक सभागृहे शोभेची वस्तू बनली आहेत. क्रीडा संकुल कागदोपत्रीच आहे, असा आरोप करण्यात आला.
रेणापुरातील विकास कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करीत शुक्रवारी रेणापूर नगरपंचायतीजवळच्या जलकुंभवर चढून प्रहार संघटनेने हे आंदोलन केले. आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ राठोड, अमोल गोडभरले, विकास तपघाले, एकनाथ काळे, भगवान काळे, केदार साखरे, मुज्जम्मिल शेख, नेताजी तंगळे, गणेश राठोड, अक्षय चव्हाण आदी सहभागी झाले होते.
फोटो कॅप्शन : रेणापूर नगरपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी रेणापूर येथील जलकुंभावर चढून प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
फोटो फाईल : २६ रेणापूर ०२