पुन्हा तेरणा काठ गारठला, किमान तापमान ११ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:41+5:302020-12-05T04:32:41+5:30
औराद शहाजानीसह परिसरात ढगाळ वातावरणानंतर थंड गारवा निर्माण झाल्याने पुन्हा थंडीत वाढ झाली आहे. सकाळी उशिरापर्यत अंगातून हुडहुडी जात ...

पुन्हा तेरणा काठ गारठला, किमान तापमान ११ अंशावर
औराद शहाजानीसह परिसरात ढगाळ वातावरणानंतर थंड गारवा निर्माण झाल्याने पुन्हा थंडीत वाढ झाली आहे. सकाळी उशिरापर्यत अंगातून हुडहुडी जात नाही. सकाळी उन्हाचा पारा वाढल्यानंतर थंडीची तीव्रता कमी हाेत आहे. औरादसह परिसरात यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने या भागातून वाहणा-या तेरणा, मांजरा नद्यांना पूर आला हाेता. या नद्यावरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत. त्यामुळे रबीचा पेरा वाढला आहे.
मध्यतंरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निवार वादळ तयार झाले हाेते. त्यामुळे ढगाळ वातावरण तयार हाेऊन हालकीशी टिप- टिप झाली हाेती. किमान व कमाल तापमानात वाढ झाली हाेती. थंडी कमी हाेती. त्याचा परिणाम कमी हाेताच वातावरण काेरडे झाले आणि उत्तरेकडून थंड वारे वाहु लागले. त्यामुळे थंडीत वाढ झाली. गुरुवारी किमान तापमान ११.५ अं. से.तर शुक्रवारी किमान तापमान ११ अं. से. पर्यंत खाली आल्याची नाेंद औराद हवामान केंद्रावर नाेंद झाली आहे.
पिकांची वाढ थांबली...
थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे वापरीत आहेत. गल्लाे-गल्ली शेकाेट्या पेटत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी अबालवृध्दांची धडपड सुरु आहे. दरम्यान, किमान तापमान ११ अंशापर्यंत खाली उतरल्याने वेलवर्गीय पिकांची वाढ थांबली आहे. रबीतील हरभरा व बडी ज्वारीचे पीक जाेमात आले आहे.